Know Your Herbs
यथा विषं यथा शस्त्रं यथाग्निरशनिर्यथा ।
तथौषधम् विज्ञातम् विज्ञातममृतं तथा ।।
Herbs used without knowledge are as dangerous as a poison, as a weapon, as a fire. Herbs used with a proper knowledge are like an elixir.
यथा विषं यथा शस्त्रं यथाग्निरशनिर्यथा ।
तथौषधम् विज्ञातम् विज्ञातममृतं तथा ।।
Herbs used without knowledge are as dangerous as a poison, as a weapon, as a fire. Herbs used with a proper knowledge are like an elixir.
Balguti is a traditional Ayurvedic tonic made from a blend of 20 dried herbs, prepared following a formulation Green Pharmacy has kept since 1993. Herbs like Kharik, Badam, Jeshthamadh, Vekhand, Bal Hirda, Ashwagandha, Suntha, Ativish etc. are rubbed on a stone with pre-boiled water or mother's milk and given to the baby as a gentle daily tonic. The herbs should be kept dry. Rinse only what's needed for the day, rub out the required amount, then dry and wipe the stone and herbs before putting them away again.
बाळगुटी हे २० औषधी वनस्पतींपासून बनवलेले पारंपरिक आयुर्वेदिक टॉनिक आहे, ग्रीन फार्मसीने १९९३ सालापासून जपलेल्या पद्धतीनुसार तयार केले जाते. खारीक, बदाम, ज्येष्ठमध, वेखंड, बाळहिरडा, अश्वगंधा, सुंठ, अतिविष इत्यादी औषधी उकळलेल्या पाण्यातून किंवा आईच्या दुधातून सहाणेवर उगाळून बाळाला दररोज सौम्य टॉनिक म्हणून दिल्या जातात. या औषधी कोरड्या ठेवणे आवश्यक आहे, दररोज लागतील तेवढ्याच धुऊन घ्याव्यात, आवश्यक तेवढे उगाळून घेतल्यावर सहाण व वनौषधी पुसून पुन्हा वाळवून ठेवाव्यात.
Green Pharmacy's Balguti is traditionally started once a baby's motions are clear, in very small amounts, with the quantity gradually increased every month as the baby grows, for 1 year.
ग्रीन फार्मसीची बाळगुटी बाळाचे पोट साफ झाल्यानंतर सुरू करावी, सुरुवातीला अत्यंत कमी प्रमाणात, आणि बाळ जसजसे वाढते तसतसे दरमहा हे प्रमाण थोडे थोडे वाढवत न्यावे, बाळ वर्षाचे होईपर्यंत नियमितपणे ही गुटी द्यावी.
Balguti is based on age-old Ayurvedic tradition and has been trusted by over 2 million families for more than 30 years. That said, it's intended as a traditional home remedy for minor, everyday complaints, it is NOT a substitute for medical treatment. If your baby has a severe or persistent symptom, please consult your paediatrician.
बाळगुटी ही वर्षानुवर्षांच्या आयुर्वेदिक परंपरेवर आधारित असून ३० हून अधिक वर्षे २० लाखांहून अधिक कुटुंबांचा विश्वास तिने मिळवला आहे. मात्र ही किरकोळ, रोजच्या तक्रारींसाठीची पारंपरिक घरगुती उपाययोजना आहे, ती वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही. बाळाला काही तीव्र किंवा सतत जाणवणारी तक्रार असल्यास कृपया बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Yes, beyond the everyday Balguti, the Balguti Information book describes specific combinations traditionally used for common concerns for cough and cold, for indigestion; and dedicated combinations for constipation, diarrhoea, fever, allergy and teething. Each herb and its traditional use is explained in detail in the book.
हो - दैनंदिन बाळगुटी व्यतिरिक्त, बाळगुटी माहिती पुस्तिकेत सर्दी-खोकल्यासाठी, अपचनासाठी तसेच पोट साफ न होणे, जुलाब, ताप, अॅलर्जी व दात येणे यासाठी विशिष्ट औषधी मिश्रणे पारंपरिकरित्या सुचवली आहेत. प्रत्येक औषधी वनस्पती व तिचा पारंपरिक उपयोग पुस्तकात सविस्तर समजावला आहे.
Flat 50 per order